निवडणुकांच्या तारखांवरुन नव्या वादाला सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, या तारखांवरुन नव्या वादाला सुरुवता झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे शेवटचे तीन टप्पे रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लीम धर्मगुरुंनी या तारखांना विरोध केला आहे. रमजानच्या महिन्यामध्ये मतदान ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेवटच्या तीन टप्प्यातील मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागमी मुस्लीम धर्मगुरुंनी केली आहे.

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशभरात ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यात ६, १२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. या तीनही तारखा रमजानच्या महिन्यात येत असल्याने या काळात मुस्लीम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घरण्याची शक्यता आहे. असे मुस्लीम धर्मगुरुंचे म्हणणे आहे. त्यामुळे या काळात मतदान घेऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणूकीचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. शेवटच्या तीन टप्प्यांपर्यंत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांत मतदान होणार आहे. या तीनही राज्यांमध्ये मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे.

ह्याहि बातम्या वाचा

मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

कष्टाचं झालं चिज ! वेटर बनला पोलिस उपनिरीक्षक

मी माढामधून लढणार नाही : शरद पवार

चार महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून करून पती पसार

मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच्छा