सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशावरुन ‘या’ माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशावरुन माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी गौप्यस्फोट केला आहे. डॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यापासून रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरुन टाकण्याची चाल माझ्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार दिलीप गांधी यांनी मतदारसंघामध्ये अनेक चांगली कामे केली. मात्र, ज्यावेळी सर्वे करण्यात आला त्यावेळी सुजय विखे यांचे नाव पुढे होते. सुजय विखे यांना भाजपमध्ये घ्यावे आणि त्यांना उमेदवारी द्यावी असे आपणच दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विखेंना उमेदवारी मिळाली असली तरी खासदार दिलीप गांधी हेही लवकरच प्रचार यंत्रणेत सहभागी होतील, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोदा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली.

Loading...
You might also like