अकोल्यात ११ उमेदवार रिंगणात ; भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला लोकसभा मतदार संघात ११ उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मुख्यतः भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. यामुळे आकोल्यात कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, अकोला लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज सादर केला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातूनही आपला अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदार संघात भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायतउल्ला बरकतउल्ला पटेल व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये ही तिरंगी लढत होणार आहे. त्यात, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत केवळ २ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ११ उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे.

अकोला लोकसभा मतदार संघातील ११ उमेदवार कोण?

भारतीय जनता पार्टी – संजय धोत्रे

काँग्रेस – हिदायतउल्ला बरकतउल्ला पटेल

वंचित बहुजन आघाडी – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

बहुजन समाज पार्टी – भाई बी.सी. कांबळे

पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटीक – अरुण वानखडे

बहुजन मुक्ती पार्टी – प्रवीणा लक्ष्मण भटकर

अपक्ष – गजानन ओंकार हरणे , अरुण मनोहर ठाकरे, प्रवीण चंद्रकांत कौरपुरिया, मुरलीधर लालसिंग पवार, सचिन गणपतलाल शर्मा