राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार डोवालांवर केलेलं ‘ते’ स्ट्राईक राज ठाकरेंवरच उलटलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमध्ये झालेला पुलवामा हल्ला घडवून तर आणला नाही ना अशी शंका उपस्थित करत कोल्हापूरातील पहिल्या सभेतच राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे संशयाची सुई वळवली होती. परंतु अजित डोवाल यांच्यावर केलेलं स्ट्राईक हे राज ठाकरे यांच्यावरच उलटलं आहे. भाजपने त्यांच्या लाव रे तो व्हिडीओ ला आता बघाच तो व्हिडीओ करत प्रत्यूत्तर दिलं. त्यात त्यांचा हा दावा खोटा ठरवत भाजपने राज ठाकरेंवर स्ट्राईक केलं आहे.

काय होता राज ठाकरे यांचा दावा

२७ डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची थायलंडमध्ये भेट झाली होती. या बैठकीत काय झाले ते विचारायला नको या भेटीनंतर एक ते दीड महिन्यातच युद्धसदृश्य परिस्थिती कशी निर्माण होते. बोलणी यशस्वी झाली की फिसकटली. असे प्रश्न करत राज ठाकरे यांन अजित डोवाल यांना संशयाच्या घेऱ्यात उभं केलं होतं. एका वेबसाईटची बातमी त्यांनी स्क्रीनवर दाखवून डोवाल यांच्यावर हल्ला केला होता.

भाजपने केलेला स्ट्राईक

त्यावर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्याच स्टाईलमध्ये याकडे लक्ष वेधलं. नियंत्रण रेषेवरील घुसखोरी हा डोवाल आणि नासेर खान जंजुआ यांच्यातील चर्चेचा विषय होता. त्यासोबतच हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावरही बैठकित चर्चा झालीय असे आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच राज ठाकरे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचाही एक व्हिडीओ दाखवला होता.

त्यात बालाकोट हल्ल्यानंतर एकाही पाकिस्तानी नागरिकाचा किंवा सैनिकाचा मृत्यू झाला नाही. असं स्वराज म्हणाल्या होत्या. त्या बातमीचं कात्रण दाखवत त्यांनी स्ट्राईकमघ्ये कुणीही मेलं नाही. असं त्या म्हणत होत्या. असं राज ठाकरे म्हणाले. भाजपने या विधानावरही भाजपने पलटवार करत त्यावेळी सुषमा स्वराज यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. त्यांनी व्हिडीओ दाखवून दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचं वायुसेनेनं ठरवलं होतं. त्यांनी आपलं काम फत्ते केलय एकाही पाकिस्तानी नागरिक किंवा सैनिकाचा मृत्यू झालेला नाही. असं वाक्य होतं.