लोकसभा 2019 : कोणाची येणार सत्ता ? सट्टेबाजारात ‘हा’ पक्ष आहे फेवरेट

जैसलमेर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत देशात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे . माध्यमांमध्ये या बाबत अनेक मेसेजही फिरताना दिसताना आहेत .  माध्यमातून याबाबत जसे सर्व्हे केले जात आहेत , तसेच सट्टा बाजारातही देशात कोणाची सत्ता येणार ? याबाबत अंदाज वर्तवला जात आहे . राजस्थानमधील सट्टा बाजारानुसार , देशात पुन्हा भाजपाच्या नेतृत्त्वाखाली एनडीएची सत्ता येणार आहे . जोधपूरजवळच्या फालोडी येथील सट्टा बाजारानुसार भाजपला यंदा 250 हून अधिक जागा मिळतील . तर एनडीएला 300 ते 310 जागा मिळतील.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार , सुरुवातीला असा अंदाज समोर आला होता की , काँग्रेसला 100 जागा मिळतील . परंतु सध्या काँग्रेसला 72 ते 74 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे . राजस्थानमधील लोकसभेच्या जागांचा जर विचार केला तर राज्यातील 25 पैकी 18 ते 28 जागांवर भाजपाला विजय प्राप्त होईल.

सट्टे बाजारानुसार , पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. तेथील जैश-ए-मोहम्मदची दहशतवादी तळं उध्वस्त केली . या कारवाईचा फायदा मोदी सरकारला होईल . या कारवाईचा परिणाम म्हणजे मतदार मोठ्या संख्येने भाजपाला मतं देतील . भारताने एअर स्ट्राईक करण्यापूर्वी सट्टेबाजाराचा असा अंदाज होता , की एनडीएला 280 जागा तर भाजपला 200 जागा मिळतील . परंतु आता एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर मतदारांचा कल बदलला आहे असे सट्टेबाजाराचे मत आहे.