भाजपाच्या टॅगलाईनची घोषणा ; प्रचार गाणं ही प्रदर्शित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची टॅगलाईन आणि प्रचार गाणे प्रसिद्ध केले आहे. यावेळी ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन आणि थीम गाणे प्रसिद्ध केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थित टॅगलाईन आणि प्रचार गाणे प्रसिद्ध केले.

यंदा भाजपा तीन संकल्पनेवर काम करत असल्याचे जेटले यांनी सांगितले. काम करणारे सरकार, प्रामाणिक सरकार आणि मोठे निर्णय घेणारे सरकार अशा तीन संकल्पना आहेत. अबकी बार फिर मोदी सरकार ही त्यांची यावेळची नवीन टॅगलाईन असेल. राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना ते म्हणाले की, केंद्रात मजबूत सरकार बनावे असे काँग्रेसला वाटत नाही. काँग्रेसने ७२ वर्षात काहीच केलेले नाही. आम्ही पाच वर्षात खूप काम करून दाखवलेले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. कारण त्यांच्या जाहीरनाम्यात मध्यम वर्गासाठी काहीच नाही. देशाच्या जनतेला निश्चित करायचे आहे की त्यांना मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार.

भाजपाच्या प्रचार गाण्यातील बोल असे, पांच साल पहले, देश ने देखा था एक सपना. सबके साथ भी होता हो, विकास सबका अपना. चाचा-भतीजा कोई नही, बस काबिलियत से देश चले. फेक-वेक, फर्जी नहीं, बस सच्चाई से देश बढे. धीरे-धीरे काम न हो, जो हो तेज फटाफट हो. कालेधन से जंग छिडे, गरीब का बेडा पार हो…..