भाजपा गोपीनाथ मुंडेंशिवाय अपूर्ण, जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही तो भाजपमध्ये नाही : देवेंद्र फडणवीस

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा दिवंगत गोपीनाथ मुंडेंशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही तो भाजपमध्ये राहू शकत नाही. जे आले त्यांना घेऊन आणि जे नाही आले त्यांच्या शिवाय आम्ही पुढे जाऊ. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांचे नाव न घेता लगावला.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपली आहे. विशेष म्हणजे ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्याचे मतदानही झाले आहे. याचदरम्यान बीड लोकसभा मतदार संघात आयोजित प्रचार सभेत बोलतांना भाजपा दिवंगत गोपीनाथ मुंडेंशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही, तो भाजपमध्ये राहू शकत नाही आणि जो भाजपसोबत आहे त्याला गोपीनाथ मुंडेंसोबत रहावंच लागेल. जे आले त्यांना घेवून आणि जे आले नाहीत त्यांच्या शिवाय आम्ही विजयाकडे वाटचाल करणार. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांचे नाव न घेता लगावला आहे.

विशेष म्हणजे, शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. इतके वर्ष पंकजा मुंडेंना पाठिंबा देणारे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच बीड मध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे.