हिंदुत्व म्हणजे सत्ता मिळविण्यासाठीचे संघाचं षडयंत्र : दिग्विजय सिंह

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हिंदुत्व शब्द आपल्या डिक्शनरीत नसल्याचे म्हटले आहे. दिग्विजय यांनी शनिवारी भोपाळमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच हिंदू धर्माविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही लोक हिंदुत्व शब्दाचा उच्चार का करता, असा सवाल उपस्थित करत दिग्विजय यांनी आपल्या डिक्शनरीत हिंदुत्व शब्द नसल्याचे म्हटले. भोपाळ लोकसभेच्या रिंगणात उतरलेले दिग्विजय सिंह यांची लढत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी आहे.
दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये ते म्हणाले की, आपण हिंदू धर्माला मानतो. हिंदू धर्म हजारो वर्षापासून जगाला मार्ग दाखवत आला आहे. परंतु, आपण हिंदु धर्माला हिदुत्वाच्या हवाली करणार नाही.

हिंदुत्व म्हणजे दुसरा तिसरा काही नसून सत्ता मिळवण्यासाठी संघाचं षयडंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मला माझ्या सनातन हिंदु धर्मावर त्याच्या ‘वसुदैव कुटुंबकम’ यावर गर्व असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.