दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा नवऱ्याने दिलेली साडीच बायकोला प्रिय : चंद्रकांत पाटील

कळंबा : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडीच बायकोला जास्त प्रिय असते. महिला मेळाव्याला स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थीक परिस्थिती आज चांगली आहे. असा टोला त्यांनी लगावला. कळंबा येथील युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी हा टोला लगावला.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झालेले आहे, यादरम्यान शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कळंबा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आम्ही युतीच्या काळात केलेली विकासकामे मीच केली असा खोटा दिंडोरा पिटणारे खासदार महाडीक स्वतः एक काम करणार आणि शंभर कामे मीच केली असे सांगणार, हे म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा प्रकार आहे. खासदार निधी व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्वच विकासकामे युती शासनाच्या निधीमधून झाली आहेत. याचे श्रेय कोणी लाटू नये, विविध शासकीय योजना राबवत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. रेल्वे, विमानतळ आदी प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. तसेच दुसऱ्याने दिलेल्या साडीपेक्षा स्वतःच्या नवऱ्याने दिलेली साडीच बायकोला जास्त प्रिय असते. महिला मेळाव्याला स्टीलच्या बुट्ट्या वाटप केले जाते पण बुट्टी खरेदी करण्या इतपत लोकांची आर्थीक परिस्थिती आज चांगली आहे. असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत पूर्वी आघाडीत बिघाडी होत असून पंतप्रधान कोण होणार शरद पवार की राहुल गांधी की अन्य या नावावर एकमेकांत जुंपली आहे. पण मोदी हेच देशाचा विकास करू शकणार असल्याने पुन्हा भाजप अर्थात मोदी सरकार निवडून येणार असेही त्यांनी म्हंटले. त्यामुळेच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोचवून त्यांना बहुमतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहनही त्यांनी केले.