शिकारी जर निबार असेल तर गुलेरने पण वाघिणीची शिकार करता येते ; धंनजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केलेल्या राष्ट्रवादी पक्षाला काही कळत नाही, वाघिणीची शिकार करायला गुलेरचा वापर करत नसतात या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिकारी जर निबार असेल तर गुलेरने पण वाघिणीची शिकार करता येते. असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
याचदरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आयोजित सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी पक्षाला काही कळत नाही, वाघिणीची शिकार करायला गुलेरचा वापर करत नसतात. असे त्यांनी म्हंटले होते.

दरम्यान, पंकजा मुंडेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देतांना, शिकारी जर निबार असेल तर गुलेरने पण वाघिणीची शिकार करता येते. असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला. तसेच  पंकजा मुंडेंना कसला गर्व आला आहे. दोन दिवसानंतर प्रचार संपणार पण अजून मला कळलेच नाही की उमेदवार मी आहे की बजरंग सोनवणे आहे. मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही. असा सवालही त्यांनी त्यावेळी केला.