जवानांच्या बलिदानावर मतं मागण्यापेक्षा घरी बसा : धनंजय मुंडे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात कारगील युद्ध झाले. तरीसुद्धा त्यांनी जवानांच्या शौर्यावर व त्यांच्या बलिदानावर मत मागितले नाही. परंतु तुम्ही पुलवामामध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या बलिदानावर राजकारण करताय. त्यापेक्षा घरी बसलेले बरे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोदींवर टीका केली. ते पुण्यातील प्रचार सभेत बोलत होते.

मुंडे पुढे म्हणाले, उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांचं काय झालं. याविषयी तुम्ही बोलने अपेक्षित होते. पण यावर बोलायला तुमच्याकडे काहीच नाही. म्हणून आता तुमच्यावर शाहिद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची वेळ आली आहे. मराठी माणसाला अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचे आवहन मोदींनी केले. मात्र, तेच गुजरातमध्ये जाऊन अफझल खानाला मुजरा करून आले. असे मुंडे म्हणाले.

जशोदाबेनचं काय झालं ते सांगा –

वर्धा येथे झालेल्या सभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली. मोदी त्या सभेत पवारांच्या कुटुंबावर बोलले. पवारांच्या घरात कलह सुरु असल्याचे सांगितले. पवारांचं जाऊद्या मोदीजी पण जशोदाबेनचं काय झालं ते सांगा. असा सवाल यावेळी मुंडेंनी उपस्थित केला.