भाजपा अध्याक्षांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना निवडणूक आयोगाची क्लिन चिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाजपा अध्यक्ष अमित शहा हे खून प्रकरणातले आरोपी आहेत या वक्तव्यावर आक्षेप घेत भजापाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे म्हणत निवडणूक आयोगाने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याना क्लिन चिट दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबलपूरमधल्या आयोजित जाहीर सभेत भाजपा अध्यक्ष अमित शहा खून प्रकरणातले आरोपी. वाह, काय शान आहे. असे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्यावेळी त्यांच्या त्या वक्तव्यावर आक्षेप घेत भजापाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या भाषणाचे तपशील मागवण्यात आला.

दरम्यान भाषणाची पडताळणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने या भाषणात आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे सांगित राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने क्लिन चिट दिली आहे.

Loading...
You might also like