Exit Poll 2019 : जया प्रदापासून उर्मिलापर्यंत ‘ह्या’ दिग्गजांचे भवितव्य धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांकडून निकालांचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमतासह ३०० पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ जण डेंजर झोनमध्ये आहेत.

१) डिंपल यादव-
उत्तर प्रदेशच्या कनोज मतदार संघातील उमेदवार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यासाठी एक्झिट पोलमध्ये धोका दाखविण्यात आला आहे. या जागेवर भाजप उमेदवाराचे पारडे जड दिसत आहे. २०१४ मध्ये डिंपल १९ हजार ९०७ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी बसपाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. सपाचा गड समजल्या जाणाऱ्या कनोज मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी डिंपल यांच्यासाठी ह्यावेळेस वाट खडतर आहे अस दाखवण्यात आलं आहे.

२) मुलायमसिंह यादव-
मैनपुरी मतदार संघातून मुलायमसिंह यांचा देखील पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तविली आहे. हा मतदार संघ समाजवादी पक्षाचा गड मानला जातो विशेष म्हणजे भाजपला इथे एकदाही विजय मिळालेला नाही. मुलायमसिंहना २००९मध्ये ३,९२,३०८मते (५६.४४ टक्के) मिळाली होती, तर २०१४ साली मोदी लाट असूनही मुलायमसिंह ५,९५,९१८ मते (६० टक्के) मिळवून विजय झाले होता.

३) राज बब्बर-
फतेपूर सिक्री येथील काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते राज बब्बर यांच्यासाठी स्थिती गंभीर दाखविण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांचा मतदारसंघ यावेळी बदलण्यात आला आहे. राज बब्बर यांनी मुरादाबादऐवजी फतेहपूर सिक्री मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

४) राहुल गांधी-
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून ३ वेळा विजयी झाले आहेत मात्र यावेळी त्यांचा विजय कठीण असल्य़ाचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे

५) एचडी देवेगौडा-
कर्नाटकमधील तुमकुर लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते एचडी देवगौडा यांना देखील विजय सोपा दिसत नाही. येथून भाजपच्या जीएस बसवाराज यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

६) शत्रुघ्न सिन्हा-
पटना मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा यांचा देखील पराभव होण्याची शक्यता आहे.पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

८) मीसा भारती-
पाटलीपुत्र मतदारसंघातून आरजेडीच्या उमेदवार आणि लालू यादव यांची लेक मीसा भारती यांना देखील पराभवाचा धक्का बसण्य़ाची शक्यता आहे.

९) आतिशी मार्लेना-
आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील उमेदवार आतिशी मार्लेना यांची वाट खडतर दिसत आहे. येथून माजी क्रिकेटर गौतम गंभीर विजय होऊ शकतो.

१०) दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह यांचा भोपाळमधून पराभव होण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंग येथे विजयी होताना दिसत आहे.

११) कन्हैया कुमार
बेगुसरायमधून कन्हैया कुमार आणि गिरीराज सिंह यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपचे गिरिराज सिंह हे सीपीआयच्या तिकीटावर लढणाऱ्या कन्हैया कुमारवर भारी पडताना दिसत आहेत.

१२) जया प्रदा –
रामपूर मतदारसंघात जया प्रदा यांची लढत सपाच्या आझम खान यांच्याविरुद्ध आहे. आझम खान यांचे पारडे जड वाटत आहे.

१३) उर्मिला मातोंडकर-
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारी आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर डेंजर झोनमध्ये आहे. भाजपच्या विजयाची येथे शक्यता आहे. येथून भाजप उमेदवार गोपाल शेट्टी विजयी होण्याची शक्यता आहे.