पालकांनी मुलांना प्रियंका गांधींपासून दूर ठेवावं : स्मृती इराणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सुसंकृत कुटूंबांनी आणि पालकांनी आपल्या मुलांना प्रियंका गांधी यांच्यापासून दूरच ठेवावं’ अशी टीका एका मुलखातीदरम्यान स्मृती इराणी यांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींचे यांच्यासमोर लहान मुलं ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरूनच अमेठी मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

याबाबत बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, ” प्रियंका या मुलांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ? त्या मुलांना चुकीची शिकवण देत आहेत. पंतप्रधानांना दुषणं देण्यासाठी त्या मुलांना सांगत आहेत. या कृतीतून प्रियंका गांधी यांचं खरं रुप दिसलं अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळीच बोलताना स्मृती इरानी पुढे म्हणाल्या, ” राजकीय हेतुसाठी मुलांचा असा वापर करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रियंका गांधी यांनी केलेली टीका ही अत्यंत खालच्या पातळीवरची आहे. असेही त्या म्हणाल्या. यावेळी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली.

प्रियंका यांच्या व्हिडीओवरून टीकेची झोड

अमेठीच्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांच्या भोवती लहान मुलांनी गराडा घातला होता आणि ते चौकीदार चोर है अशा घोषणा देतात. ही घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीही घातली. शिवी घातल्याबरोबर प्रियंकांनी तोंडावर हात ठेवल्याचं व्हीडीओत दिसतं आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली.ठली.

You might also like