उदयनराजेंनी सातारा सोडून इतर मतदार संघातही प्रचार करावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या तोंडावरच स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान देण्यात आले नव्हते मात्र आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या पक्षातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनेक नेत्यांना वगळण्यात आले होते. त्यावरून अनेक वादही निर्माण झाले होते. विशेष मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उदयनराजे यांना स्थान देण्यात आले नव्हते. मात्र आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे. विशेष म्हणजे उदयनराजे यांनी नुकतीच पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघात सभा घेतली.

Loading...
You might also like