अपप्रचार थांबवा नाहीतर कपडेच उतरवतो ; ‘या’ उमेदवाराचा नवनीत राणांच्या पतीवर संताप

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अगामी लोकसभा निवडणुकांचे रनाशिंग फुंकले आहे. प्रचार, रॅली आणि सभांना वेग आला आहे. असे असताना आपल्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारावर, त्याच्या पक्षावर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. त्याचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर देखील उमटताना दिसत आहेत. अमरावतीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या वतीने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या विरोधात प्रचार चालू केला आहे त्यामुळे देवपारे चांगलेच संतापले असून “माझा अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो” अशी धमकीच दिली आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ बोलताना थोडं तारतम्य ठेवावं. तुम्ही आमदार असाल पण सत्तेचा माज करू नका. तुम्ही अपप्रचार थांबवला नाही तर कपडेच उतरवतो अशा भाषेत देवपारे यांनी धमकी दिली आहे. तसेच यासंदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. गुणवंत देवपारे हे अमरावती लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवडणूक लढवत आहेत. अपप्राचार करीत असल्याच्या कारणावरून देवपारे यांनी रवी राणा यांच्या विरोधात सिटी कोतवालीत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.