राहुल गांधी यांच्या जीवाला धोका ? गृह मंत्रालयानं दिलं हे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राहुल गांधी अमेठी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना लक्ष करण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा दावा करत काँग्रेसने चौकशीची मागणी केली होती. तसेच त्या संदर्भात गृहमंत्रालयाला पत्र देण्यात आले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यावर गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

गृह मंत्रालयाने याबाबतची माहिती एसपीजीने दिली आहे. राहुल गांधी यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. ज्या हिरव्या लाईटबद्दल बोललं जात आहे ती काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या मोबाईलमधील आहे. शिवाय, काँग्रेसकडून कोणतंही पत्र मिळाले नसल्याचं गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत काँग्रेसने गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. त्यावर आता गृह मंत्रालयाने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी काँग्रेसने राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येची देखील आठवण करून दिली.