आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील

रामपूर : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्यामध्ये सध्या जोरात वाकयुद्ध रंगलं आहे. माझ्या कपड्यांवर बोलणाऱ्या आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील हे मला माहित नाही. असा सल्ला जयाप्रदा यांनी मायावती यांना दिला आहे. त्यामुळे आझम खान आणि जयाप्रदा यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीत.

मायावती यांना सल्ला देताना जयाप्रदा म्हणाल्या की , ‘आझम खान माझ्यावर टिपण्णी करतात. माझ्यावर टीका करतात. माझे अश्लील फोटो व्हायरल केले जातात. माझ्या कपड्यांवर बोलणाऱ्या आझम खान यांचे डोळे एक्स रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे कुठे नजर मारतील हे मला माहित नाहीत्यामुळे बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचा प्रचार करताना विचारपूर्वक करावा. ‘

काय आहे प्रकरण –

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. रामपूरमधील प्रचार सभेत भाजप उमेदवार जयाप्रदांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला होता . तसेच निवडणूक आयोगानं ७२ तासांसाठी प्रचारबंदी घातली होती.