ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळा विटंबनामुळे बंगालचे राज्यपाल दुखावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना काल पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात झाली होती. त्या विटंबनेमुळे बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी खूप दुखावले गेले आहेत.

ते म्हणाले कि, कोलकाता विद्यापीठाचा कुलपती असल्याच्या नात्याने मला या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. पुतळ्याची विटंबना करणारे खरे गुन्हेगार शोधून त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे. विद्यासागर यांचा नवीन पुतळा त्याच जागी बसविण्यासाठी कोलकाता विद्यापीठाने लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजेत.

दरम्यान, भाजपच्या गुंडांनी पुतळ्याच्या विटंबना केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषेदेत केला आहे. तसेच पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाने देखील मोर्चा काढला आहे.

You might also like