चौकीदार मोहिमेवर भाजप आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर भाजप – काँग्रेसच्या सोशल मीडियावरील हॅशटॅग ट्रेंडमध्ये भाजपा आघाडीवर तर काँग्रेस पिछाडीवर जातांना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप करत मोदींवर चोरीचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी ‘चौकीदार चोर है’ चा नारा दिला होता. त्यावेळी भाजपने हॅशटॅग मै भी चौकीदार ( #MainBhiChowkidar ) मोहीम सुरु केली. त्यानंतर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी काँग्रेसने हॅशटॅग चौकीदार चोर है ( #ChowkidarChorHai ) मोहिम सुरू मात्र.

ट्विटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १६ आणि १७ मार्च या दोन दिवसांत ट्विटरवर #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा तब्बल १५ लाख वेळा वापर झाला होता. तर #ChowkidarChorHai हा हॅश टॅग १७ आणि १८ मार्च रोजी केवळ एक लाख ६९ हजार वेळा वापरण्यात आला. जो की भाजपच्या तुलनेत १० टक्के देखील नव्हता.

यावरून, काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या फेऱ्या झडत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर देखील एकमेकांना पछाडण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. यावरून काँग्रेस भाजपच्या सोशल मीडियावरील लढाईत भाजपा आघाडीत तर काँग्रेस पिछाडीवर असलयाचे दिसत आहे.