सरकारमध्ये कमालीचा बदल ; २०१४ च्या निवडणुकीत ‘चहावाले’ आणि आता ‘चौकीदार’ 

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या निवडणुकीत चहावाले होते. आता ते चौकीदार बनले आहेत. अशी टीका  बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेवर केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलचे नाव बदलले असून चौकीदार नरेंद्र मोदी असे केले आहे. भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेवर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी टीका केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी चहावाले होते. आता ते चौकीदार बनले आहेत. अशी टीका त्यांनी केली. इतकेच नव्हे तर ५ वर्षात भाजप सरकारमध्ये कमालीचा बदल झाला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

विशेष म्हणजे, मायावती यांच्या आधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही भाजपच्या या मोहिमेवर टीका केली होती. मोदी पकडल्यानंतर संपूर्ण देशाला चौकीदार करण्याच्या तयारीत आहेत. अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. तसेच चौकीदारची गरज श्रीमंतांना असते, गरिबांनी नव्हे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली होती.