राज ठाकरेंचा एकला चलो रे ! चा नारा , लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडीत सामील होणार या चर्चेने राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र आता आगामी लोकसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. कोणाला मनसेकडून उमेदवारी द्यायची याबाबत कृष्णकुंजवर तयारी सुरु झाली आहे. एवढेच नाही तर यासंदर्भातली घोषणा उद्या मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे स्वत: करणार आहेत. ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांची दिली आहे.

सत्तेतील भाजप सरकारला पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे असे आव्हान राज ठाकरे यांनी केले होते. राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून , व्यंगचित्रांमधून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाआघाडीत यायला मनसे तयार होते पण त्यांच्या महाआघाडीत सामील होण्याला राष्ट्रवादीचा जरी ग्रीन सिग्नल असला तरी काँग्रेसला मात्र ते मान्य नाही. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे आता मनसेने स्वबळाची तयारी करीत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नकार – होकारात बराच वेळ गेला. तो पर्याय बाद झाल्यानं, आता पुढे काय, हा प्रश्न तमाम मनसैनिकांना पडला आहे. त्याचं उत्तर राज ठाकरे यांनी शोधलंय आणि ते उद्या स्वबळाचा नारा देऊ शकतात, असं सूत्राने सांगितले आहे.