मोदींनी पुन्हा दिला चकवा ; ‘या’ अधिकाऱ्याला दिली थेट ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काल मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानांतर आता कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सगळेच जण आपल्याला वजनदार खाते मिळण्याची अपेक्षा करत आहेत. मात्र अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मोदींनी काल देखील सर्वांना एक धक्का दिला.

टेक्नोसॅव्ही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुणवत्ता घेऊन त्यांना उचित संधी देण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. काल देखील त्यांनी अशाच प्रकारे आपल्या एका माजी अधिकाऱ्याला मंत्रीपद देऊन हि गोष्ट त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली.

माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा मोदींनी काल आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला आहे. अनेक द्विपक्षीय संबंधामधील रणनीतीमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळेच मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून घेतला आहे. एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदी यांची पहिली भेट चीनमध्ये झाली होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासून जयशंकर आणि मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. डोकलाम वादापासून ते संयुक्त राष्ट्रसंघात देशाची बाजू अत्यंत समर्थपणे मांडण्यात जयशंकर यांनी मोलाचा वाटा राहिला आहे.

दरम्यान, मोदींचा पहिला अमेरिका दौरा यशस्वी करण्यात देखील त्यांचाचा हात होता. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्याचबरोबर आणखी एका अधिकाऱ्याला मोदी यांनी पराभूत होऊन देखील आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. हरदीप सिंग असे त्यांचे नाव असुन मोदींनी त्यांच्यावर देखील विश्वास टाकला आहे.