विधानसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या. असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. नागपूरात प्रसार माध्यमाशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. मात्र सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार उद्या ( ८ मार्च ) संध्याकाळी ५ वाजता निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होणार असल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला गेले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याचे वक्तव्यही विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केली आहेत. मात्र महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या. असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इतकेच नव्हे तर, आज रात्री महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाणार आहे. अशी जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र ही चर्चा संपूर्णपणे निराधार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, लोकसभा-निवडणुकीची तारीख कधी जाहीर होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.