स्वतःची कार नाही म्हणणाऱ्या ओवेसींकडे ‘रायफल’ आणि ‘पिस्तूल’

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद लोकसभा मतदार संघातून एआयएमआयएमचे नेते असुदोद्दीन ओवेसी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात ओवेसी यांनी आपल्याकडे स्वत:ची कार नसल्याचे नमूद केले आहे. परंतु आपल्याकडे एनपी बोर २२ पिस्तुल आणि एक रायफल असल्याचे म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, हैदराबाद लोकसभा मतदार संघातून एआयएमआयएमचे नेते असुदोद्दीन ओवेसी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ओवेसी हे तीन वेळा खासदार होऊन गेले आहेत.  आता चौथ्यावेळी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ओवेसी यांच्याकडे दोन लाख रुपये रोख असून २०१७-१८ मध्ये त्यांचे उत्पन्न १०,०१,०८० रुपये एवढे होती. तर २०१६-१७ मध्ये त्यांचे उत्पन्न १३,३३,२५० रुपये होते.  इतकेच नव्हे तर, ओवेसी यांनी दिलेल्या घोषणापत्रानुसार त्यांच्याकडे १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात ओवेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे १३ कोटी ३० लाखांची स्थावर मालमत्ता असून त्यांच्यावर नऊ कोटी ३० लाखांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात ओवेसी यांनी आपल्याकडे स्वत:ची कार नसल्याचे नमूद केले आहे. परंतु आपल्याकडे एनपी बोर २२ पिस्तुल आणि एक रायफल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोन्हींची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे

इतकेच नव्हे तर, असुदोद्दीन ओवेसी विरुद्ध पाच गुन्हे असून एकही गुन्ह्यात त्यांना अद्याप दोषी ठरविण्यात आलेले नाही.