मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ : ८-१० जागा मिळवणारे पण पाहताहेत ‘पंतप्रधान’ बनण्याचे स्वप्न 

चंदोली : वृत्तसंस्था – विरोधक आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील जुगलबंदी दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येत आहे. आज देखील नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण अबकी बार मोदी सरकार हे जनतेनं मनाशी ठरवलं आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. उत्तर प्रदेशमधील चंदोलीमध्ये  झालेल्या सभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

ज्या नेत्यांच्या ८-१०, ३०-३५ जागा निवडून येतात असे नेते देखील पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी जनतेने मनावर घेतले आहे, त्यामुळे यावेळी देखील आमचेच सरकार येणार असल्याचे पुन्हा एकदा मोदींनी  सांगितले. स्थिर सरकार देण्याचे उत्तर अद्याप आघाडीच्या नेत्यांकडे नसल्याचे देखील यावेळी मोदी म्हणाले.

दरम्यान, यावेळी मोदींनी विविध विषयावर भाष्य केले. भारतीय सुरक्षिततेचा मुद्दा असो किंवा दहशतवादाचा मुद्दा असो. मोदींनी सगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांचेदेखील कौतुक केले. पूर्वांचलमधल्या शुगर फ्री तांदळाची खूप चर्चा होत आहे. वाराणसीत आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आलं आहे. याचा फायदा घेऊन आपण आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे देखील मोदी यावेळी शेतकऱ्यांना म्हणाले.