भाजपामध्ये मला फक्त ‘ही’ एकच व्यक्ती ओरडू शकते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंदौर : वृत्तसंस्था – भाजपामध्ये केवळ महाजनच अशा आहेत ज्या मला ओरडू शकतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांची स्तुती केली आहे. मध्यप्रदेशातील इंदौर येथे ते बोलत होते. लोकसभा स्पीकर म्हणून सुमित्रा ताईंनी फार उत्तम कामगिरी पार पडली आहे. त्यांनी सगळीकडे आपली छाप पाडली आहे. तुम्ही सर्व मला पंतप्रधान म्हणून ओळखता, पण पार्टीत मला कोणी ओरडू शकत असेल तर त्या ताई आहेत. असे मोदी म्हणाले.

सुमित्रा ताई आणि मी पक्ष संघटनेत खूप काम केले आहे. त्यामुळे इंदौरच्या विकासातील ताईंचे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही असे मी अश्वासन देतो. असे मोदी यावेळी बोलताना म्हणाले. सुमित्रा महाजन या १९८९ ते २०१४ दरम्यान सलग आठ वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. सुमित्रा महाजन यांचे वय सध्या ७६ वर्ष आहे. त्यांनी स्वतः यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मात्र ७५ पेक्षा जास्त वय झालेल्या नेत्यांना भाजपने यावेळेस उमेदवारी दिली नसल्याचे समजते.

दरम्यान, यावेळी इंदौरमधून भाजपाचे स्थानिक नेते शंकल लालवानी (५७) यांना महाजन यांचे उत्तराधिकारी बनवून इंदौरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. इंदौर लोकसभा क्षेत्रात १९ मे ला मतदान होणार आहे. या ठिकाणी लालवानी आणि काँग्रेस उमेदवार पंकज संघवी यांच्यात लढत होणार आहे. येथे साधारण २३.५ लाख मतदार आहेत.