“सुशीलकुमार शिंदे म्हणजे दलितांमधलं बुजगावणं”

प्रकाश आंबेडकरांचा शिंदेंवर पलटवार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – बाबासाहेब आंबेडकरांचा नातूच घटनेचा खून करण्यास निघाला आहे. अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. ‘ सुशील कुमार शिंदे यांनी दलितांसाठी काय केलं असा सवाल करीत सुशीलकुमार शिंदे म्हणजे दलितांमधलं बुजगावणं’ अशी टीका केली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुर मतदार संघात काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे आणि भारिप बहुजन महासंघाकडून प्रकाश आंबेडकर आमने सामने आहेत.

सुशीला कुमार शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले,  ‘राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय निवडणुकीचा पुरस्कार केला होता. इंदिरा गांधींना विचारुन हे विधान केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मग घटना बदलण्याचा प्रयत्न कोणी केला?’ असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला.

मात्र माझ्या डोक्यातील मेमरी चिप जास्त जीबीची –

याबाबत बोलताना आंबेडकर पुढे म्हणाले, ‘शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी जीबीची आहे. मात्र माझ्या डोक्यातील मेमरी चिप जास्त जीबीची आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात राहतात,’ असं आंबेडकर म्हणाले. ढसाळे, ढाले आणि ओवैसींची भाषा एकच असल्याचं त्यांनी म्हटलं. रविवारी सुशीलकुमार शिंदे यांनी आंबेडकरांवर जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणलं. मात्र, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी टीका शिंदेंनी केली होती.