साध्वी प्रज्ञा सिंह ‘सिंगर’ म्हणून जेलमध्ये गेल्या नव्हत्या : राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सिंगर म्हणून जेलमध्ये गेल्या नव्हत्या तर बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या होत्या. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान, त्यांच्या त्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठकरे यांनी निशाणा साधला आहे. प्रज्ञा सिंह सिंगर म्हणून जेलमध्ये गेल्या नव्हत्या तर बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या होत्या. बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला कारागृहात जशी वागणूक दिली जाते, तशी वागणूक प्रज्ञा सिंहला मिळाली, त्यात वेगळ अस काय झाले. असे राज ठकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साध्वी प्रज्ञा सिंह यांचे समर्थन करत आहेत. हे दुर्दैवी आहे. नरेंद्र मोदी बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपींच समर्थन करत असतील तर त्यांच्या मनात, देशाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांबद्दल काय आदर आहे हे उघड झाले आहे. असेही त्यांनी म्हंटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like