नरेंद्र मोदींच्याच हातात देश सुरक्षित : रामदेव बाबा

२०१४ प्रमाणेच २०१९ मध्येही रामदेव बाबा भाजपच्या प्रचारासाठी सक्रिय

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकिची रणधुमाळी जोरात सुरु असतांनाच भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी रामदेव बाबा पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जयपूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी रामदेव बाबांची प्रमुख उपस्थिती होती.

रामदेव बाबा यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले तरी रामदेव बाबा कुठे दिसत नव्हते. मात्र आता रामदेव बाबा पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते. जयपूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी रामदेव बाबांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. त्यांच्या हातात जवानांचे भविष्य सुरक्षित आहे. शेतकऱ्यांची शेती, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, महिलांची आब्रु सुरक्षित आहे. तसेच देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारीही मोदींनी घेतली आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणेच २०१९ मध्येही आपल्याला नरेंद्र मोदी यांना आशिर्वाद द्यावा लागणार आहे. असे रामदेव बाबा यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, लोकसभा निवडणुक ही एखाद्या व्यक्तीची गोष्ट नसून व्यक्तीमत्वाची गोष्ट आहे. आपण कायम व्यक्तीमत्वाची उपासना केली आहे. चित्राची नव्हे तर चरित्राची उपासना केली आहे. असेही त्यांनी म्हंटले. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपाला मतदान करा. असेही त्यांनी म्हंटले.