गणित चुकलं कुठं ? ४० हजार मतदान असताना केवळ ४५०० मतं, जिल्हाध्यक्षांवर कारवाई

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या निवडणुकीत काही मतदार संघांचे निकाल अगदी अनपेक्षित लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्यामुळे बहुजन समाज पक्षाने राज्यभर काही पदाधिकाऱ्यांवर कारवाईत केली आहे. यामध्ये औरंगाबादेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये जया राजकुंदल या बसपाच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांच्या पराभवात नेत्यांचा सहभाग होता असे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आहे.

औरंगाबाद मतदार संघात बहुजन समाज पक्षाचे जवळपास ४० हजार मतदान आहे. पण प्र्प्रत्यक्षात मात्र पक्षाचे उमेदवार राज कुंदल यांना फक्त ४५०० मतदारांचे मतदान झाले. महेंद्र सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्या विजयासाठी काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईत करण्यात आली आहे. पक्षाने सोलापूर, नागपूर येथील काही पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीच्या निवडणुकांमुळे बसपाला ४०,००० पेक्षा अधिक मते मिळली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत केवळ ४००० मते मिळली आहेत. तसेच पक्षाचे केडर बेस मतदान ४० ते ४५ हजार आहे. ही मते नेहमी बसपाच्या उमेदवारालाच मिळतात. मात्र यंदा बसपाची मते दुसऱ्या उमेदवाराला मिळाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मिळलेल्या निवडणुकीच्या आकडेवारीनंतर पक्षाने ही कारवाई केली आहे.

You might also like