Post_Banner_Top

भाजपा पासून दूर असलेल्या ‘या’ माजी आमदाराचा संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पाच वर्षांपासून भाजपा पासून दूर असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांनी सांगलीचे भाजपचे लोकसभा उमेदवार संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच सांगली आणि हातकणंगले या दोन्ही जागेवरील महाययुतीचे उमेदवार निवडणूक यावे यासाठी ताकदीने प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काह्ही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिलला पहिल्या टप्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून भाजपा पासून दूर असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांनी सांगलीचे भाजपचे लोकसभा उमेदवार संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर. त्यावेळी बोलतांना मागच्या लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते, त्यामुळे मी नाराज होतो. पण आता सांगली व हातकणंगले या दोन्ही जागी महायुतीच्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी ताकदीने प्रचार करणार करणार आहे. असे संभाजी पवार यांनी म्हंटले.

संभाजी पवार यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले. आमचे व त्यांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. गत निवडणुकीवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते. पण त्यामुळे आमच्यात कुठेही कटुता नव्हती. पवार यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांचा आशीर्वाद व शक्ती माझ्या पाठीशी राहणार आहे. असे संजयकाका पाटील यांनी म्हंटले.

यावेळी, भाजपचे आमदार सुरेश हळवणकर, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील यांनी संभाजी पवार यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली त्यावेळी त्यांनी पाठिंबा जाहीर केला.

Loading...
You might also like