तर आम्ही शरद पवार यांना पाठींबा देऊ : गणपतराव देशमुख

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार यांच्या लोकसभा उमेदवारी वरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. अशातच सांगोलचे शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांनी माढा मतदारसंघातून जर शरद पवार उमेदवार म्हणून उभे राहिले तर आम्ही यांना पाठींबा देऊ असे गणपतराव देशमुख यांनी म्हणले आहे.

आज सांगोल्यात दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी शरद पवार उदघाटक म्हणून उपस्थित राहिले होते त्या प्रसंगी भाषण करताना गणपतराव देशमुख बोलत होते. गणपतराव देशमुख आणि शरद पवार यांचे जुने घनिष्ठ संबंध आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकी वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले असता राष्ट्रवादीने गणपतराव देशमुख यांच्या विरोधात दीपक साळुंखे हे तगडे उमेदवार इच्छुक असताना देखील उमेदवार नदेता गणपत राव देशमुख यांना पाठींबा दिला होता. त्याचीच परतफेड म्हणून गणपतराव देशमुख यांनी शरद पवार हे उमेदवार झाल्यास आपण त्यांना पाठींबा देऊ असे म्हणले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या ६ विधानसभापैकी सांगोला विधानसभा मतदारसंघ एक आहे. त्या मतदारसंघावर आमदार गणपतराव देशमुख यांची चांगलीच पकड आहे. मागे शरद पवार २००९मध्ये याच मतदारसंघात उभे राहिले असता त्यांना गणपतराव देशमुख यांनी पाठींबा दिला होता. दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार माढ्यातून निवडणूक लढण्याचा निश्चित निर्णय घेतली असे म्हणले आहे.