तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत ; भाजप नेत्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाबाबत सूचक विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने २२० ते २३० जागा जिंकल्या तर कदाचित नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. असे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

येत्या ६ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सर्वत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, त्यांच्याऐवजी नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. परंतु हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल. असे भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले आहे. याचबरोबर, भाजपाने २२० किंवा २३ जागा जिंकल्या, आणि एनडीएच्या मित्र पक्षांना 30 जागा मिळाल्या, तर तो आकडा २५० पर्यंत जाईल. पण तरीही बहुमतासाठी ३० जागांची गरज लागणार आहे. अशा परिस्थितीत मोदी पंतप्रधान राहणार की नाही, हे एनडीएतील इतर मित्र पक्ष ठरवणार आहेत. आम्हाला ३० किंवा ४० जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षाने जर मोदींना पंतप्रधान करण्यास विरोध केला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान करणार नाही. असे त्यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. असे झाल्यास मला फारच आनंद होईल. असेही त्यांनी म्हटले. तसेच गडकरीही मोदींसारखीच चांगली व्यक्ती आहे. तसेच गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत. असेही ते म्हटले. याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचे भाजपाचे नेतृत्वही बदलू शकतो. असा दावाही त्यांनी केला.