अरुण जेटलींनी मानले काँग्रेसचे अभार ; धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार

अरुण जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर बिहारच्या पटना-साहिब या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. भाजपने सिन्हा यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने सिन्हा यांना उमेदवारी दिली, तर रविशंकर प्रसाद विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा अशी लढत होणार आहे.

या मुद्यावरुन भाजप नेते आणि केद्रीय मंत्री अरुण जेटलींनीही काँग्रेसच्या आडून शत्रुघ्न सिन्हा यांना लक्ष केले आहे. त्यांनी फेसबुकवर एक ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये त्यांनी भाजपाच्या काही नावाजलेल्या चेहऱ्यांना कांग्रेसने बक्षीस म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे आभार मानतो, कारण काँग्रेसनं आमच्या डोक्याला ताप झालेले शत्रुघ्न सिन्हांना त्यांच्या पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांसाठी काही गोष्टी चांगल्या नाहीत. कारण राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला कोणत्याही राज्यात इतर पक्षांशी अर्थपूर्ण आघाडी करण्यात यश आलेलं नाही.

तसेच त्यांनी विरोधकांच्या गठबंधनला सर्कशीची उपमा दिली आहे. महागठबंधन पहिल्यांदाच अपयशी झालं आहे. कारण तिसऱ्या टप्प्यातील नामांकनंही अंतिम टप्प्यात आली आहे. गठबंधनजवळ कोणीही नेता नाही किंवा कोणतीही योजना नाही. त्यांचे विचारही जुळत नाही. त्यांना वाटतं की, अराजक परिस्थिती निर्माण करून सत्ता प्राप्त करता येऊ शकते. पण तसं कधीच होऊ शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत.

You might also like