मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच्छा

कोलकत्ता : वृत्तसंस्था – देशभरात १७ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यामध्ये मतदान होईल. मात्र या निवडणूक तारखा रमजान महिन्यात येत असल्याने तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा –

निवडणूक तारखांना विरोध करताना तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम म्हणाले की , ‘निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्ही त्यांचा सन्मान राखतो, निवडणूक आयोगाविरोधात आम्ही काही भाष्य करू शकत नाही. मात्र निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना रमजान महिन्याचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करणं गरजेचे होते. रमजानचा रोजा सुरु होणार असल्याने मतदान टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो. रमजानचा रोजा ठेवून मुस्लिम मतदारांना मतदान करणे शक्य होणार नाही. अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा आहे.’

६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी होणाऱ्या मतदानावर रमजानचा परिणाम होईल. ५४३ लोकसभा जागांपैकी १६९ जागांवरील मतदान प्रक्रियेत याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होईल उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. असा आरोपही तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी केला आहे.

मुस्लिम समुदायाच्या भावना लक्षात घ्याव्यात –

लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. मुस्लिम समुदायाच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रमजान महिन्यात होणाऱ्या मतदान तारखा बदलण्याची मागणी केली.

ह्याहि बातम्या वाचा – 

धक्कादायक ! हेअर ट्रान्सप्लांटनंतर उद्योजकाचा मृत्यू

मी ‘करिअर’ म्हणून राजकारणाला कधी निवडले नाही

पुण्यातून असीम सरोदे असणार आपचे उमेदवार ?

“मोदींमुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली”   

मनसेचे आमदार शरद सोनवणे यांची घरवापसी