तर आम्ही भगवा हातात घेण्यासाठी लायक नाही : उद्धव ठाकरे

रामटेक (नागपूर) : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी आज सभा घेण्यात आली. कळमेश्वर येथील कृषी बाजार समितीच्या मैदानात झालेल्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विदर्भातल्या ७ जागांवर ११ एप्रिलला मतदान होत आहे. आजचा रविवार हा प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने सगळ्याच पक्षांनी प्रचाराची धूम होती.
शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी आत्महत्या करू नका. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आम्ही सर्व शक्ती लावून शेतकऱ्यांना मदत करू. जर शेतकरी, महिला यांचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही भगवा हातात घेण्यासाठी लायक नाही, असे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने जनसंघर्ष यात्रा गेल्या चार वर्षात काढल्या. त्यांना वाटले की सेना भाजप एमेकांशी भांडण करत आहेत. त्यामुळे आपले जमेल. पण आम्ही युती केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या गाडीचे टायर पंचर केले.
राहुल गांधींवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षातील लोक देशद्रोही आहेत असे माझे म्हणने नाही. राहुल गांधी हे युती सरकार नालायक आहे हे सांगताहेत. पण त्यांनी वचन दिलेत ते काही पूर्ण झाले नाहीत. जो कोणी देशद्रोही असेल त्याला फासावर लटकवला जाईल. राहुल गांधी देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करतात अशी टीका त्यांनी केली.

Loading...
You might also like