‘मी जोशात आणि होशातही, आता खरी सुरुवात झाली ; अजून खेळ रंगू द्या…

उर्मिला मातोंडकरांचा विरोधकांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हा राजकारणात आपल्याला संधी दिली जाते, त्यावेळी आपल्याला पुढचा विचार करावा लागतो. तेंव्हा मागे वळून पाहण्यास तुम्हाला वेळ नसतो. उमेदवारी मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे ‘मी जोशात आणि होशात आहे असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हंटले आहे. काँग्रेसच्या वतीने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला मुंबई उत्तर मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर, मुंबई उत्तर मतदार संघातून काँग्रेसतर्फे उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारीही देण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या उमेदवारीवर आक्रमक भूमिका घेत, जेव्हा आपल्याला राजकारणात संधी दिली जाते, त्यावेळी आपल्याला पुढचा विचार करावा लागतो. तेंव्हा मागे वळून पाहण्यास तुम्हाला वेळ नसतो. उमेदवारी मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्ण प्रयत्नांसह निवडणूकीला सामोरी जाणार आहे. असे उर्मिला मातोंडकर हिने म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, त्यामुळे मी जोशात आणि होशात दोन्हीत आहे असेही तिने म्हंटले.

विशेष म्हणजे, उर्मिला मातोंडकर यांनी मला मुंबईकर असल्याचे प्रमापत्र मागू नये, असे आधीच स्पष्ट केले आहे. देशात सध्या प्रत्येक गोष्टीच प्रमाणपत्र मागितले जाते. मला विरोधकांपेक्षा मुंबईची अधिक माहित आहे. मी सतत लोकांच्या संपर्कात आहे. आता संपर्क साधण्याचे व्यासपीठ बदलले आहेत. जनतेशी आमचा समोरासमोर संपर्क येणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर, आता खरी सुरुवात झाली असून खेळ रंगू द्या, पुढे बघुयात काय होतय. असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.