Post_Banner_Top

विरोधकांकडून आपले जोड्यांची लेस बांधून घेतो, वरुण गांधींचे वादग्रस्त विधान

मुंबई : वृत्तसंस्था – यंदाची लोकसभा निवडणूक वादग्रस्त विधानांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आता संजय गांधी यांचे सुपुत्र वरुण गांधी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मी संजय गांधी यांचा मुलगा आहे. आणि कोणत्याही नेत्याला घाबरत नाही. उलट त्यांच्या हातून बुटांची लेस बांधून घेतो असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका प्रचार रॅलीतील आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जिभ घसरणे हे आत जनतेला नवीन राहिले नाही. त्यातच मेनका गांधी यांच्या मुलगा वरुण याची जीभ घसरली आहे. उत्तर प्रदेश मधील सुल्तानपुर येथील एका प्रचार रॅलीला संबोधताना वादग्रस्त विधान केले आहे. मी संजय गांधी यांचा मुलगा आहे. मी एक गोष्ट जनतेला समजावून सांगतो. येथे कोणालाही भिण्याची गरज नाही. मी येथे उभा आहे. मी विरोधकांकडून आपल्या जोड्यांची लेस बांधून घेतो, असे वक्तव्य वरूण गांधी यांनी केले आहे.

वरूण गांधी हे सध्या सुल्तानपुर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. यंदा भाजपाने त्यांचा मतदार संघ बदलला असून त्यांच्या सुल्तानपूर मतदार संघातून त्यांची आई मेनका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. वरूण गांधी आईच्या प्रचारासाठी सुल्तानपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Loading...
You might also like