सुमित्रा महाजन यांच्या विरोधात अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार ?

भोपाळ : मध्य प्रदेश वृत्तसंस्था – लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा पराभव घडवून आणण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असल्याचे चित्र आहे. कारण काँग्रेसने सलमान खान यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसापूर्वी केली होती तर आता गोविंदाच्या नावाची चर्चा देखील काँग्रेसने इंदूरच्या जागेसाठी केली आहे. त्यामुळे गोविंदा सुमित्रा महाजन यांच्या विरोधात निवडणूक लढणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.

गोविंदाने मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेऊन इंदूर मधून लढण्याबाबत विचार विनिमय केला आहे. त्यांचे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. आता पक्ष माझ्यावर कोणती जबाबदारी टाकतो हे पाहण्यासारखे राहणार आहे असे गोविंदाने माध्यमांशी संवाद साधताना म्हणले आहे.

दरम्यान इंदोर लोकसभा मतदारसंघात सिंधी मतदार संख्या अधिक असल्याने त्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस तेथे गोविंदा कार्ड खेळू पाहत आहे असे बोलले जाते आहे. या आधीही गोविंदाने २००४ साली लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. त्यावेळी गोविंदाने उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. मात्र लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झालेल्या गोविंदाने संसदेचे तोंड कमीच पहिले. त्याने संसदेत नजाण्याबरोबर लोकांचे प्रश्न देखील सोडवले नाहीत असा गोविंदावर आरोप केला जातो.