बाई तुम्ही कोठे राहता ? ‘त्या’ काँग्रेस उमेदवाराला मतदारांचा सवाल

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – बाई तुम्ही राहता कोठे ? असा प्रश्न वर्धा लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता खजानसिंग टोकस यांना मतदारांनी केला आहे. मतदार संघातील ज्या गावात त्या प्रचाराला जातात तेथील मतदार त्यांना हा प्रश्न करत आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्धा लोकसभा मतदार संघातून माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांची कन्या अ‍ॅड. चारूलता खजानसिंग टोकस यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे निवडणुकीत विजयी होण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. टोकास मतदार संघातील प्रत्येक गावात प्रचाराला जात आहेत. त्या ज्या गावात प्रचाराला जात आहेत त्या गावातील मतदार बाई तुम्ही राहता कोठे ? असा प्रश्न त्यांना करत आहेत. इतकेच नव्हे तर, मतदारांचा तीव्र रोष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारा प्रती दिसून येत आहे. त्यामुळे आघाडीला वर्धा मातंद्रा संघात मोठा फटका बसणार इलायची शक्यता वर्तवल्या जात आहे.

विशेष म्हणजे, अ‍ॅड. चारूलता खजानसिंग टोकस यांना केवळ माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांची कन्या या एकाच निकषाच्या आधारे काँग्रेसने तिकीट दिले आहे. असेही स्थानिकांचे मत आहे. याचबरोबर लग्नानंतर त्या गुडगाव येथे कायम राहण्यासाठी निघून गेल्या त्यानंतर दिवाळी, दसऱ्यालाच त्या इकडे यायच्या. तसेच मागील पंधरा वर्षांपासून त्या वर्ध्यामध्ये वास्तव्याला नाहीत. असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता खजानसिंग टोकस आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रामदास ताडस यांच्यात हा सामना होणार आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास ताडस यांनी विजय मिळवला होता.