कोण आहेत सुजय विखेंना टक्कर देण्यारे संग्राम जगताप ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संभाव्य उमेदवार डाॅ. सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता सुजय विखे यांच्याशी आमदार संग्राम जगताप यांचा थेट सामना होईल.

…आणि संग्राम जगताप पहिल्यांदा महपौर झाले

विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य अरूण जगताप यांचे पु्त्र आमदार संग्राम जगताप हे बी.काॅम झाले आहेत. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे (गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय) ते उपाध्यक्ष आहेत. वडिल अरूण जगताप हे दुसऱ्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झाले आहेत. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते जावई आहेत. आमदार संग्राम जगताप पहिल्यांदा २००९ मध्ये अहमदनगर महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले, याचवेळी पहिल्यांदा ते महापौैर झाले.

संग्राम जगताप यांची पत्नी, बंधू आणि भावजईविषयी थोडक्यात…

२०१४ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवत संग्राम जगताप हे दुसऱ्यांदा महापौर झाले. महापौर पदावर असतानाच त्यांनी २०१४ मध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. यावेळी त्यांनी सेनेचे उपनेते अनिल राठोड आणि भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांचा पराभव केला. त्यांची पत्नी शितल जगताप दोनदा नगरसेविका झाल्या असून त्या विद्यमान नगरसेविका आहेत. आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटाचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. भावजई सुवर्णा सचिन जगताप या मांडवगण गटातून अहमदनगर जिल्हा परिषेदेच्या विद्यमान सदस्या आहेत.

कोण आहेत संग्राम जगताप यांचे साडू आणि मेहुणी ?

आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाच्या घटनेसंदर्भात तीन महिने कारावासही भोगला आहे. बहुचर्चित असणाऱ्या लांडे खून प्रकरणात आरोपी असणारे माजी महापौर संदीप कोतकर यांचे संग्राम जगताप हे साडू आहेत. सुवर्णा कोतकर या त्यांची मेहुणी असून केडगाव हत्याकांडात त्या आरोपी आहेत. सुवर्णा कोतकर या सध्या फरार आहेत.

Loading...
You might also like