भाजप-काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास ‘हे’ ५ पक्ष ठरणार ‘किंगमेकर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे अवघे दोन टप्पे बाकी आहेत. सत्ताधारी भाजपला बहुमत मिळणार कि नाही याचे भविष्य वर्तवण्यात राजकीय पंडित व्यस्त झाले आहेत. त्यामुळे कदाचित काँग्रेस देखील जास्त जागा जिंकू शकतो अशी देखील शक्यता एका बाजूला वर्तवण्यात येत आहे. परंतु जर दोघानांही बहुमत मिळाले नाही तर त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागू शकते. त्यात हे पाच प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका पार पडू शकतात.

हे पक्ष पार पडू शकतात महत्वाची भूमिका

१) वायएसआर काँग्रेस :

जननमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे. वायएसआर काँग्रेस आंध्र प्रदेशात १२-१५ जागा जिंकण्याची शक्यता आहे. परंतु, पाठिंबा कुणाला देणार याबद्दल त्यांनी अद्याप काही स्पष्ट केलेले नाही.

२) बिजू जनता दल :

ओडिसामध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या बीजेडीचे प्रमुख आणि ओडिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्यांचे देखील १०-१५ खासदार निवडून येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा देखील महत्वाचा असणार आहे.

३) तेलंगणा राष्ट्र समिती :

तेलंगणा राष्ट्र समितीची देखील या सगळ्यात महत्वाची भूमिका राहणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची तेलंगनामध्ये पकड मजबूत आहे. तेलंगना राष्ट्र समितीचे १२ ते १५ खासदार निवडून येण्याची शक्यता आहे.

४) तृणमूल काँग्रेस :

ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस देखील या सगळ्यात फार महत्वाचा पक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या सत्तेवर असणाऱ्या या पक्षाच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. तृणमूल काँग्रेस देखील २०-२५ जागा जिंकेल असा अंदाज आहे.

५) सपा -बसपा महाआघाडी :

उत्तर प्रदेशातील सगळ्यात महत्वाचा घटक हि आघाडी आहे. या आघाडीला उत्तर प्रदेशमध्ये २०-२५ जागा जिंकण्याचा विश्वास आहे, त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन्ही पक्ष वेळ पडल्यास काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात.
त्यामुळे आता निवडणूक निकालानंतर हे पाच प्रादेशिक पक्ष कोणाला पाठिंबा देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.