भाजपच्या ‘या’ नेत्याकडून ममतांचा ‘बगदीदी’ म्हणून उल्लेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकात्यात अमित शहा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते आणि ममता बॅनर्जी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसू येत आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. कालच्या सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर टीका केल्यानंतर आज त्यांनी ममता बॅनर्जी यांची ‘बगदादी’ याच्याशी तुलना केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरून टीका करताना म्हटले आहे कि, भाजपाला घाबरत ममता बॅनर्जी त्यांच्या सभांचे मंच देखील तोडून टाकत आहे. कामगारांना मारहाण करून सभा रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे ‘बगदादी’कडून प्रेरणा घेऊन त्यांना ‘बगदादी’ व्हायचे आहे, अशी खरमरीत टीका देखील योगी यांनी केली.

दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांना सभा घेण्यास मनाई करण्यात आली होती, मात्र योगींनी कुणालाही न जुमानता हावडा येथे सभा घेतली आणि ममता यांच्यावर जोरदार टीका केली होती. ममता यांची एक्सपायरी तारीख जवळ आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले होते.