Lok Sabha Election 2024 | मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार, आदिती तटकरेंच्या नावाची चर्चा, श्रीरंग बारणे म्हणाले- ‘उमेदवार पाहून निवडणूक…’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) एक वर्ष बाकी असतानाच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागावाटप झाले नसले तरी मित्रपक्ष एकमेकांच्या जागांवर दावा सांगत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मावळ लोकसभा मतदारसंघातून (Maval Lok Sabha Constituency) आघाडीकडून कोण उमेदवार असणार, पुन्हा पार्थ पवार (Parth Pawar) लढणार की राष्ट्रवादीच्या (NCP) माजी मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांनी भाष्य केलं आहे.

 

पार्थ पवार किंवा आदिती तटकरे यांच्यापैकी कोणता उमेदवार विरोधात उभा राहिल्यास लढत सोपी होईल असा प्रश्न श्रीरंग बारणे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना बारणे म्हणाले, मी गेली अनेक वर्ष राजकारणात (Maharashtra Politics News) काम करत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठोवून मी कधीच काम केलेले नाही. जनमानसात जाऊन, त्यांची कामे सोडवण्याचे काम मी करतो. अधिक वेळ मी जनतेसाठी देतो. त्यामुळे मझ्यासमोर कोण उमेदवार आहे हे पाहून मी निवडणूक लढवली नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणतरी उमेदवार असणार आहे.

 

विरोधी पक्ष कोणाला तरी उमेदवारी देईल. मी मावळ लोकसभा मतदारसंघात 2024 निवडणुकीला लोक संपर्काच्या जोरावर सामोरे जाणार आहे. निवडणूक अद्याप दूर आहेत. त्यामुळे यावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही. भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Former MLA Bala Bhegde) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात बोलतान बारणे म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

भाजपने (BJP) यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अगोदर पक्ष बांधणीचे काम केले आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मला मदत केली आहे. पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून भाजप संघटनात्मक बांधणी करत आहे. भाजप-शिवेसना (Shivsena) आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित समोरे जाणार असल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

 

Advt.

2019 च्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांना श्रीरंग बारणे
यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. मात्र, श्रीरंग बारणे यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
राजकारणामध्ये पवार कुटुंबातील सदस्याचा हा पहिलाच पराभव असल्याने या पराभवाचे शल्य आजही पवारांसह राष्ट्रवादीला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सावध पावले उचलली जात आहेत.
मावळ मधून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मुलीला रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे.

 

 

Web Title :  Lok Sabha Election 2024 | mp shrirang barne reaction on maha vikas aghadi candidate
for maval in upcoming lok sabha elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा