Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey) यांनी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीतील जस्त बूथ संख्या असलेल्या तीन मतदान केंद्रांना भेट दिली. (Pimpri Police News)

पोलीस आयुक्तांनी गुरुवारी (दि.22) सकाळी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्त बुथ संख्या असलेल्या महादू सस्ते मनपा शाळा बोराडेवाडी, सावित्रीबाई फुले मनपा शाळा मोशी गावठाण, नागेश्वर विद्यालय मोशी या मतदान केंद्रांना भेट देऊन सर्व सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेतला व तेथील बुथची व मतदान केंद्र परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 शिवाजी पवार उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर लावण्यात येणारा बंदोबस्त, बाहेरुन मागविण्यात येणारा बंदोबस्त, मतदान केंद्र निहाय लावण्यात येणारा बंदोबस्त याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच गुन्हेगारी टोळ्या व अभिलेखावरील गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईचे नियोजन केले आहे. मोक्का, एमपीडीए, फौजदारी प्रक्रिया संहिता, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, महाराष्ट्र दारुबंदी अॅक्ट या काद्यांतर्गत कारवाया करण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी