Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआची समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समितीत समावेश; ठाकरे गटाकडून कोण? उद्धव ठाकरे घेणार निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Election 2024 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देखील सक्रिय झाली आहे. महाविकास आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मविआमधील तीन प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन नेते असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मविआच्या लोकसभा निवडणूक समितीमध्ये (Lok Sabha Election Committee) वर्णी लागावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीकडून तयार करण्यात आलेली ही समिती 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 48 मतदार संघाचे तीन पक्षांसाठी जागावाटप ठरवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) तर काँग्रेसकडून (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची नावे अंतिम झाली आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांचे अंतिम झाले आहे. संजय राऊत यांच्या सोबत दूसरा नेता म्हणून कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.

महाविकास आघाडीच्या निवड समितीवर संजय राऊत यांच्यासोबत दुसरा नेता म्हणून वर्णी लागावी यासाठी
सुभाष देसाई (Subhash Desai), अनिल देसाई (Anil Desai), अरविंद सावंत (Arvind Sawant), विनायक राऊत
(Vinayak Raut), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याची माहिती
वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. बुधवारी दुपारी यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :  Lok Sabha Election 2024 | uddhav thackeray will decide sanjay raut and other shivsena ubt leader for mva lok sabha election committee

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, तृतीयपंथी व्यक्तींना कंत्राटी सेवक म्हणून घेणार

ACB Trap News | 40 हजार रुपये लाच घेताना पोलिसाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Maharashtra Politics News |  ठाकरे गटाला पाहिजेत लोकसभेच्या इतक्या जागा, मविआच्या बैठकीतील महत्त्वाची बातमी लिक!