‘स्वत: चोरी करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचे ही तर काँग्रेसची जुनी सवय’

उर्मिला मातोंडकरांच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चोरी स्वत: करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचे ही काँग्रेसची जुनी सवय अशी टीका भाजपाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचारादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यावेळी उर्मिला मांतोडकर यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना त्यांनी ही टीका केली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, बोरिवली स्थानकाजवळ उर्मिला मांतोडकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. त्यावेळी उर्मिला मांतोडकर यांनी भाजपावर कडाडून टीका केली. त्यानंतर, या घटनेचा गोपाळ शेट्टींनी तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच, जसा भाजपाला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. तसेच जनतेलादेखील आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणे चुकीचे आहे. असे भाजपाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, छुपे आणि चोर हल्ले करून निवडणूक लढू नका हिंमत असेल, तर केलेल्या कामांच्या बळावर निवडणूक लढवा. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, आपली अनामत रक्कमही वाचणार नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आले आहे. म्हणून ते अशा प्रकारची कृत्यं करून स्वत:साठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोक समजूतदार आहेत. त्यांना कोण खरे कोण खोटे ते कळते. असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
You might also like