मी मुस्लिम मतदारांबद्दल जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांनी जे दाखवले त्यात खूप फरक : मेनका गांधी

सुलतानपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मी लिहिलेलं वाचून दाखवत नाही. मी जे काही बोलते ते मनापासून बोलते. मी प्रचार सभेत मुस्लिम मतदारांबद्दल जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांनी जे दाखवले त्यात खूप फरकआहे . आमच्या आयटी सेलने या प्रकरणात काहीच केले नाही. असे म्हणत केंद्रीय मंत्री मेनका गांधी स्वतःच्याच आयटी सेलवर भडकल्यात.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, केंद्रीय मंत्री मेनका गांधी मुस्लिम मतदारांबद्दल केलेल्या विधानाने वादात अडकल्या आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर त्या स्वत:च्याच आयटी सेलवर भडकल्या. मी लिहिलेले वाचून दाखवत नाही. मी जे काही बोलले, ते मनापासून बोलले, ‘मी भाषणं पाठ करून येत नाही. मी प्रचारसभेत मुस्मिम मतदारांबद्दल जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांनी जे दाखवले, ते पूर्णपणे वेगळे होते. मी अशी नाही. मुस्लिम बांधव आमच्यासोबत यावेत, यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करते आहे. मात्र यावेळी आमच्या आयटी सेलने या प्रकरणात काहीच केले नाही. असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

इतकेच नव्हे तर, आयटी सेलने माझे भाषण घेतले नाही ना काही केले. त्यामुळे अशा आयटी सेलची खरंच गरज आहे का असा प्रश्न मला पाडतो. आयटी सेलवाले दिवसभर फोटो क्लिक करतात. ते फोटो अपलोड करतात. अशा पद्धतीनं निवडणूक होऊ शकत नाही. असेही त्यांनी म्हंटले.