मला साथ द्या, नाहीतर…; केंद्रीय मंत्र्याची मुस्लिम मतदारांना धमकी

सुलतानपूर : वृत्तसंस्था – भाजपचे खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचे समोर आले आहे. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा उद्या माझ्याकडे एखादे काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते समजून घ्या, असे मेनका गांधी यांनी सुलतानपूरमधील सभेत म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री असलेल्या मेनका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मुस्लिमबहुल तुराबखानी भागातील प्रचारसभेत त्यांनी उपस्थितांना जवळपास धमकीच दिली. मि निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही खुल्या मनाने आलो आहोत. उद्या तुम्हाला माझी गरज लागेल. त्यामुळे तुम्ही आताच पाया रचून ठेवा. हीच योग्य वेळ आहे. अशा शब्दांमध्ये त्यांनी मुस्लिमांना धमकावले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मी निवडून आले, तर तुमची कामे करणार नाही असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला. माझ्या फाऊंडेशनने तुमच्यासाठी १ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र जेव्हा निवडणूक येते, तेव्हा तुम्ही म्हणता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. मी तर निवडणूक जिंकले आहे. मात्र हा विजय तुमच्याशिवाय कडू आहे. त्यामुळे जेव्हा निकाल लागेल आणि तुमच्या बूथवरून ५० किंवा १०० मत येतील. त्यानंतर तुम्ही माझ्याकडे कामाला याल, तेव्हा तुम्ही समजून जा अशी धमकी मेनका गांधी यांनी दिली.